डॉ.चव्हाण यांची व त्यांच्या ज्ञानराज हॉस्पीटलची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी !- आकाश होनमाने

प्रतिनिधी -विद्रोही फकिरा न्युज मो 8605812612
अकलूज येथील डॉ. अभिमन्यू चव्हाण व त्यांच्या ज्ञानराज हॉस्पीटलची चौकशी करून कार्यवाही करावी या बाबतचा तक्रारी अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने यांनी दिला आहे ज्ञानराज हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रॅक्टिस करत असलेल्या डॉ.अभिमन्यू चव्हाण हे स्वतः हॉस्पिटल मध्ये पेशंट ऍडमिट करून घेत आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारचे उपचार करत आहेत सदर डॉ.चव्हाण यांची B.H.M.S डिग्री आहे.व ते डिग्रीच्या पेक्षा मोठे उपचार रुग्णांवर करत आहेत अशाने एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतनारी अनपेक्षित घटना घडू शकते तरी याची ही चौकशी करण्यात यावी संबंधित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पेशंटची आर्थिक लूट केली जाते त्यामुळे गोरगरीब जनतेला त्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. तसेच हॉस्पीटल संबंधित सर्व परवानगी कागदपत्रे तपासणी करण्यात यावी तसेच बँक खाते पडताळणी व्हावी, तसेच शासकीय कर भरला आहे का याची ही चौकशी करण्यात यावी आणि संबंधित हॉस्पिटलची चेकलिस्ट नुसार सखोल चौकशी करून काही त्रुटी आढळून आल्यास संबंधित डॉक्टरवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर विषयी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडण्यात येतील असा इशारा आकाश होनमाने यांनी दिला आहे.



