४२ – बोरगाव जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारात भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या गोड बाता ऐकुन जनता नाराज

प्रतिनिधी:-विद्रोही फकिरा न्युज मो. 9096812612
४२ बोरगाव जिल्हा परिषद निवडणूकीचा प्रचार सुरू आसताना भारतीय जनता पक्षाच्या कर्तव्य शुन्य नेत्यांच्या भाषणात विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून पोकळ आश्वासने, उमेदवारांच्या गावातील विकासकामे अर्धवट ठेवून निवडणूकीपुरत्या एम.आय.डीसी. व इतर विषयांवर पोकळ गप्पा हाणताना दिसत आहेत मात्र परिसरातील माताभगिनींचे प्रश्न न सोडवता आल्याने तसेच बोरगाव गटातील माता भगिनीं दुसऱ्या तालुक्यात वाहनांत लोंबकळत उदरनिर्वाहासाठी जात आहेत ही विदारक परिस्थिती असताना त्यांना हे प्रश्न २८ वर्षांच्या काळात कधीसुद्धा सोडवू वाटले नाहीत यांमुळे जनता गालातल्या गालात हसताना दिसतेय काय त्या थापा मारुन मतांची झोळी भरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय परंतु बोरगाव गटातील जागृत मतदार, गोरगरीब जनता पोकळ भुलथापांना बळी न पडता जनतेच्या हितासाठी काम करणार्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करणार असल्याचे राजकीय वर्तुळात जनतेतून बोलले जात आहे तसेच पाण्याचे प्रश्न, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिलेला नाही,कलावंत – वारकरी संप्रदाय – शेतकरी – दलित बांधवांचे प्रश्न व शासकीय योजनेचा लाभ कधीही मिळवून देण्यासाठी व घरकुल बांधकाम कामगार लोकांना कोणतेही शासकीय योजना मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत याऊलट गोरगरीब लोकांचे रेशन लुट,विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्यात मग्न आसल्याचे जणतेतुन बोललं जात आहे तर इतर गावांतील प्रमुख नेत्यांनवर जनतेवर केलेला अन्याय अत्याचाराविरोधात जागृत व स्वाभिमानी बोरगाव गटातील मतदार बंधू भगिनीं मतदान स्वरूपात भाजपला धडा शिकवनार असल्याची चर्चा गावा-गावांतील जनतेत बोलले जात आहे आणी हुषार जणता हळुच गालातल्या गालात खुद कन हासताना दिसत आहे बोरगाव जिल्हा परिषद गटातिल भाजप उमेदवाराचा पराभव हा निश्चित असल्याची सुत्रांची माहिती आणी जणतेतुन भावना व्यक्त केली जात आहे



