जवाहर नवोदय मध्ये एस.पी. स्कूलचे घवघवीत यश ऋतुजा सातुरे हिची नवोदय पोखरापूर साठी निवड

प्रतिनिधी:-विद्रोही फकिरा न्युज मो. 9096812612
नांदोरे ता.पंढरपूर येथील पायल फाउंडेशन संचलित एस.पी.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. यामधून इ.सहावीसाठी ऋतुजा महादेव सातुरे हिची 97.5 गुण मिळवून जनरल मधून नवोदय (पोखरापूर ) या ठिकाणी निवड झाली . या परीक्षेसाठी प्रशालेमधून एकूण 30 विद्यार्थी बसले होते त्यापैकी हर्षराज बाबर, आरोही साळुंखे, अनिरुद्ध गायकवाड, ओमराज कदम, स्वरांजली पाटील, सिया शिंदे, प्रज्वल तळेकर, आरोही गायकवाड, अजिंक्य मुळे, कार्तिकी कदम, सई माने,आयुष कानगुडे या विद्यार्थ्यांनी 90 च्या वर गुण मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ.नंदकुमार होनराव,संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे,मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण,उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर, माध्यमिक विभागप्रमुख साईनाथ कुंभार यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव प्रशालेच्या वतीने करण्यात आला. यावेळी हरिदास भिंगारे, विलास सातुरे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन डोके, स्वाती चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले



