Uncategorized

गोदा ते नर्मदा’ या पुण्यश्लोकअहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ

प्रतिनिधी : विद्रोही फकिरा न्यूज उपसपादक :आकाश होनमाने -9850838487

त्र्यंबकेश्वर व चोंडी येथून होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य, विचार व वारसा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या सादरीकरणावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन तसेच जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी ही महाराष्ट्रात असून त्यांचा सांस्कृतिक वारसा राज्याशी घट्ट जोडलेला आहे. सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलव्यवस्थापन व वारसा संवर्धन या त्यांच्या कार्यातील मूल्यांचा प्रसार करण्यासाठी ही जलयात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.२५ एप्रिल रोजी चोंडी व त्र्यंबकेश्वर येथून जलयात्रेला प्रारंभ होऊन शिर्डी येथे संगम होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, घृष्णेश्वर, धुळे मार्गे इंदूर येथे २९ एप्रिल रोजी समारोप होणार आहे.या जलयात्रेदरम्यान मार्गावरील गावांमध्ये व शहरांमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून,अहिल्यादेवींच्या विचारांचा व्यापक प्रसार घडवून आणण्याचा हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button