Uncategorized

अशोका चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता करून मिळावा !योद्धा प्रतिष्ठानचे प्रांताधिकारी यांना निवेदन.

प्रतिनिधी:- विद्रोही फकिरा मो 9096812612

अकलूज शहरातील अशोका चौक ,गांधी चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर तातडीने रस्ता करून मिळावा या मागणीसाठी योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भैय्या खिलारे यांनी प्रांताधिकारी यांना अनेक सहकाऱ्यांसह निवेदन दिले आहे. वरील मार्गावर असणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. मोठे-मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.शिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या रस्त्यावरील खड्ड्यांमधून प्रचंड प्रमाणात धुळ उडत आहे त्याचा त्रास सर्व व्यापारी व सदर रस्त्यावर छोटे मोठे व्यावसायिकांना होत आहे त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा रस्ता अशाच अवस्थेत आहे. तरी हा रस्ता तातडीने करण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील असा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी अकलूज विभाग यांना योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते केशवभाऊ लोखंडे ,सौरभ वाघमारे,आकाश होनमाने,करण कांबळे,करण ठोंबरे,वैष्णवी खिलारे,शिवदत्त नामदास, रफीक भाई सय्यद,अरबाज फकीर इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button