Uncategorized

खंडाळी गावच्या उपसरपंचपदी रिकेश चव्हाण यांची निवड

[] खंडाळी गावच्या उपसरपंचपदी रिकेश चव्हाण यांची निवड []खंडाळी (वार्ताहर)[]खंडाळी (ता. माळशिरस) येथे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडीची बैठक सरपंच सुनीता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ठरल्याप्रमाणे उपसरपंच सुरेखा पताळे यांनी राजीनामा दिल्याने समविचारी मोहिते पाटील पॅनलचे रिकेश रामचंद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अश्वजीत सरवदे यांनी रिकेश चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली

[] निवडच्या बैठकीसाठी विद्यमान सरपंच सुनीता सुरवसे,माजी सरपंच बाबुराव पताळे,माजी उपसरपंच सुरेखा पताळे,नूतन उपसरपंच रिकेश चव्हाण,गटनेते अमर रिसवडकर,मारुती पताळे, मछिंद्र पवार,नितीन थोरात,शिवाजी शिंदे, मनोज खरात, विद्या भोसले,तबुस्सम सय्यद, गंगुबाई गोडसे,मंदाकिनी खटके, पमाबाई शिंदे,उज्वला सकट, उज्वला खंडागळे,उर्मिला खंडागळे आदिनी निवड बिनविरोध होण्यास सहकार्य केले.

[] यावेळी ऍड. शहाजीराव इंगवले-देशमुख, शहाजीअप्पा पताळे,विठ्ठल पताळे, सुरेश सुरवसे,अनिल भोसले,श्रीनाथ खटके,महेबूब सय्यद,महादेव साबळे, आनंद चव्हाण, मारुती अवघडे, पै. अब्बासाहेब चव्हाण, सुधाकर सकट व ग्रामविकास अधिकारी सत्यवान पवार व समविचारी आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button