Uncategorized

जत तालुक्यातील २९ गावांपर्यंत स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा मोठा निर्णय! आमदार गोपीचंद पडळकर साहेब

प्रतिनिधी: विद्रोही फकीरा उपसंपादक आकाश होनमाने -9850838487

सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथें पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहून जत तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. त्यावर तातडीने उपाययोजना करत, जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.या योजनेमुळे प्रत्येक गावाला स्वच्छ, स्थिर आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, तसेच नागरिकांवरील पाणीबिलाचा भारही कमी होईल.यावेळी पाटबंधारे विभागाच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक लघुपाटबंधारे तलावांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे.बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय खंदारे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, जत तालुक्यातील संबंधित अधिकारी, सरपंच व जनप्रतिनिधी उपस्थित होते.जत तालुक्याच्या पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक साहाय्य आणि प्रशासनिक सहकार्य देण्याची ग्वाही मा. मंत्री महोदयांनी दिली.जतकरांच्या जीवनात दिलासा देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल मा. गुलाबराव पाटील साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button