पानीव, ता. माळशिरस श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम महिला महाविद्यालय नूतन इमारत उद्घाटन सोहळा सपन्न

प्रतिनिधी: विद्रोही फकीरा न्यूज उपसंपादक आकाश होनमाने -9850838487
नोव्हेंबर : पानीव तालुका माळशिरस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री.प्रकाश बापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सौ.श्रीलेखा पाटील, ॲड. अभिषेक पाटील, श्री. करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी आज माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.याप्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम महिला महाविद्यालयच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माढा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर,माजी आमदार राजन पाटील साहेब,आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माळशिरस तालुक्याचे कार्यसम्राट मा.आमदार रामभाऊ सातपुते, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार – सावंत,माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बापू मोरे, भाजपा किसानमोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर, प्रवीणभैया पराडे,भाजपा तालुकाध्यक्ष शरद मदने पाटील,शिवराज पुकळे, तालुका उपाध्यक्ष रणजीत ठवरे पाटील, संदीप काळे, तसेच माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते महिला- भगिनी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित पदाधिकारी मान्यवर आणि माळशिरस तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना माळशिरस तालुक्यातील 22 गावांना लवकरच निरा – देवधरचे पाणी मिळणार असून पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या 22 गावांसह माळशिरस तालुक्यातील इतर गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर मा.आमदार राम सातपुते यांनी सतत पाठपुरावा करून या गावांना पाणी देणारे योजनेला गती दिली असून लवकरच या गावांचा पाण्यासाठीचा वनवास संपणार आहे.



