शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शासन पुढे यावे. आमदार गोपीचंद पडळकर

प्रतिनिधी: विद्रोही फकीरा न्यूज उपकार्यकारी संपादक आकाश होनमाने- 9850838487
राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजावला आहे. याला माझा जत मतदारसंघही अपवाद आहे. गेल्या दहा दिवसांपासून जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक गावे शासनाच्या निकषात बसत नसली तरी प्रत्यक्षात शेतकरी बांधवांचे पिके, फळबागा व उपजीविकेचे साधन पूर्णपणे नष्ट झाले आहेत. वळसंग, मुचंडी, माडग्याळ या मंडळांमध्ये ६५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून उर्वरित मंडळांमध्ये जरी पावसाचे मोजमाप कमी असले तरी पाणलोटामुळे आणि सलग झालेल्या पावसामुळे शेतजमिनींवर पाणी साचले, पिकांची मुळे कुजली, आणि शेतकरी हवालदिल झाले.माझ्या मतदार संघातील उमदी महसुल मंडळात १८ सप्टेंबर रोजी ३५ मिमी पाऊस नोंदला गेला. पण लगतच्या मंगळवेढा तालुक्यातील मंडळांमध्ये ५० ते ७७ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे पाणी नैसर्गिक उताराने जत तालुक्यात वाहून आल्याने उमदी परिसरातील पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेगाव मंडळातील खैराव गावात मुख्यालयापेक्षा जास्त पाऊस पडून पिके उद्ध्वस्त झाली आहेत.ही परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे. शासन निकष हे वास्तव परिस्थिती दर्शवत नाहीत. शेतकरी घामाने उभे केलेले पिके पावसात वाहून गेल्याने आता ते उपासमारीच्या उंबरठ्यावर आले आहेत.



